Article Chatni Recipes Marathi %e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%82 %e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%a3%e0%a4%9a%e0%a4%82 113112000015_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काकडीचं लोणचं

काकडीचं लोणचं
WD
साहित्य: एक मोठी वाटी काकडीचे बारीक तुकडे, तिखट १ चमचा, मीठ चवीप्रमाणे, मोहरी १/२ चमचा, मेथी १/४ चमचा, बडीशेप पाव चमचा, हिंग पाव चमचा, हळद पाव चमचा, साखर चिमूटभर, तेल दोन चमचे लिंबाचा रस दीड चमचा.

कृती: प्रथम काकडीचे बारीक तुकडे करून घ्यावे, अथवा चोचवून घ्यावी. त्या तुकडय़ांना हळद व मीठ लावून ठेवावे.
मिक्सरमध्ये चिमूटभर मीठ घालून मोहरी, मेथी व बडीशेप यांची एकत्र पूड करून घ्यावी. व ती पूड काकडीला चोळावी, लगेच लिंबाचा रस चोळून घ्यावा. एका कढल्यात तेल, हिंग, मोहरीची फोडणी करून ती थंड झाल्यावर त्यात तिखट घालून सारखे करून ती फोडणी व मीठ काकडीच्या फोडींवर घालावे. थंड असलेल्या काकडीचा उन्हाळ्यात भाजी, कोशिंबीरीला उत्तम पर्याय.

Share this Story:

Follow Webdunia marathi