साहित्य : 1 किलो कारले, 25 ग्रॅम पुदिनाची पानं, 25 मोठी वेलची, 10 ग्रॅम लवंगा, 5 ग्रॅम दालचिनी, 5 ग्रॅम जिरं, 1 ग्रॅम हिंग, 30 ग्रॅम तूप, 400 ग्रॅम लिंबाचा रस, मीठ चवीनुसार.
कृती : सर्वप्रथम कारल्यांना सोलून त्यांना मीठ लावून 2-3 तास ठेवावे. सर्व मसाल्यांना भाजून त्यात थोडं मीठ व लिंबाचा रस टाकावा. आता कारल्यांना मधून चिरा देऊन त्यात मसाला भरून दोऱ्याने बांधून द्यावे. ह्या कारल्यांना बरणीत भरावे व वरून लिंबाचा रस घालावा, कारले पूर्णपणे लिंबाच्या रसात भिजले पाहिजे, जर कमी पडत असेल तर अजून रस टाकावा. 2 दिवसानंतर हे लोणचे वापरण्यात घ्यावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा