कोहळ्याची साल काढून टाकावी व त्याच्या चौकोनी किंवा जरा लांबट मध्य आकाराच्या फोड कराव्यात. या फोडी चुन्याच्या निवळीत एक ते दोन दिवस बुडवून ठेवाव्या. नंतर काढून, स्वच्छ पाण्याने धुऊन, साध्या पाण्यात नरम होईपर्यंत शिजवाव्यात किंवा वाफवून घ्याव्यात. फोडी शिजवून घेतल्या असल्यास त्या फडक्यावर तीन-चार तास पसरून ठेवाव्यात. कोहळ्याचा फोड्यांच्या मापा इतकी किंवा वजनाइतकी साखर घेऊन तिचा पक्का पाक करावा व त्यात फोडी घालून, पाक दाट होईपर्यंत शिजवावे. नंतर खाली उतरवून गार झाल्यावर त्यात हवा असल्यास गुलाबाचा इसेन्स किंवा अन्य कोणताही आवडत असेल तो इसेन्स घालावा. नंतर बरणीत भरून ठेवावा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा