साहित्य : 1 वाटी पिकलेली चिंच, पाव वाटी बेसन
फोडणीसाठी - तेल, मोहरी, जिरं, कढीपत्ता व हिंग चवीनुसार गूळ, बारीक चिरलेली आले. कोथिंबीर पाव वाटी, ओल्या नारळाचा चव, लसूण पेस्ट, पाव वाटी, मसाला अर्धा चमचा, लाल मिरचीचे तुकडे.
कृती : गरम पाण्यामध्ये चिंच भिजवून घ्या. 2 तासांनी चिंच कोळून घेऊन, आवश्यकतेनुसार पाणी घाला, बेसन घालून गुठळी होऊ न देता कालवून घ्या. पातेलीत फोडणी करून कढीपत्ता व हिंग घाला. लाल मिरचीचे तुकडे घाला. कढीचे सार घाला. वरून तिखट, मीठ, आले, लसूण, हळद, काळा मसाला व चवीनुसार गूळ घाला. नारळाचा चव व कोथिंबीर घाला. उकळी येऊ द्या. आंबट-गोड चवीची कढी जेवणात छान वाटेल.