साहित्य : अगदी लालभडक असलेले 1/2 टोमॅटो, 200 ग्रॅम साखर, 2 चमचे व्हिनीगर. चवीनुसार मीठ, तीन लहान कांदे, थोडेसे आले, पाच-सात लसणाच्या पाकळ्या, 2-3 लाल मिरच्या, दालचिनीचा तुकडा.
कृती : एका भांड्यात पाणी उकळत ठेवा, पाणी उकळू लागले की त्यात धुतलेले टोमॅटो टाका. 5 मिनिटानंतर भांड्यावर झाकण ठेऊन गॅस बंद करून द्या. थंड झाल्यावर पाणी ओतून एका टोमॅटोची साले हाताने काढून टाकून टोमॅटो मिक्सरमधून फिरवून चाळणीतून गाळून घ्या. कांदे, आले, लसूण सर्वांची मिक्सरमधून जाडसर पूड करून घ्या. एका पांढऱ्याशुभ्र मालामालाचा कपड्यात ती पूड घालून त्याची गाठ बांधून ती मसाल्याची पोटली टोमॅटोच्या रसात टाकून चांगले शिजू द्या. चांगले उकळू द्या, नंतर त्यात मीठ व साखर घाला. रस घट्ट झाला की त्यातली मसाल्याची पोटली काढून घ्या. शेवटी व्हिनीगर घाला.