साहित्य : 4 केळी, 1 कप साखर, 500 ग्रॅम क्रीम.
कृती : सर्वप्रथम केळींना मॅश करून घ्यावे. मिक्सर मधून साखर बारीक करून घ्यावी. त्या साखरेत मॅश केलेली केळी व क्रीम घालून परत एकदा मिक्सर मधून फिरवून घ्यावे. हे बटर बरणीत भरून ठेवावे. मुलांना फार आवडत असून हे पौष्टिक पण आहे.