साहित्य : 250 ग्रॅम बेसन, 1 1/2 चमचा मीठ, 3/4 चमचा तिखट, 1/2 शेंद मीठ, 1/4 जिरं पूड, 1 1/2 चमचा साखर, 1/4 चमचा गरम मसाला, 50 ग्रॅम चिंच, 1 गाजर कीस, 1 काकडीचा कीस, 1/4 मुळ्याचा कीस, 1/2 इंच आलाच तुकडा, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, तळण्यासाठी तेल.
कृती : बेसनामध्ये 1 चमचा मीठ व 1/2 चमचा तिखट टाकून भज्यासारखे पातळ घोळ तयार करावे. तेल गरम करून मोठ्या झाऱ्याने बुंदी पाडावी. बुंदी थंड झाल्यावर 2-3 मिनिट पाण्यात घालून हलक्या हाताने दाबून काढावी. चिंच, 1/2 कप पाण्यात टाकून गाळून घ्यावी. त्यात साखर, 1/2 चमचा मीठ, शेंद मीठ, 1/4 चमचा ितखट, जिरं पूड व गरम मसाला घालावा.
मुळा व काकडीला किसून त्याचे पाणी काढून बुंदीत मिक्स करावे. गाजर, आलं, हिरव्या मिरच्या व कोथिंबीर टाकून सर्व्ह करावे.