साहित्य : 250 ग्रॅम बोर थोडे कमी पिकलेले, 50 हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा हळद, एक चमचा धने पूड, मीठ 1 चमचा, 1/2 चमचा गरम मसाला, मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला, आलं एक इंच बारीक केलेला, एक चिमूट हिंग, आमचूर पावडर 1/2 चमचा, 1/2 चमचा जिरं, एक मोठा चमचा तेल व कोथिंबीर.
कृती : सर्वप्रथम बोर धुऊन स्वच्छ पुसून घ्यावे व त्यातील बिया काढून घ्यावा. हिरव्या मिरच्या लांबट कापून घ्याव्या. गरम तेलात बोर डीप फ्राय करून हलके गुलाबी होईपर्यंत तळावे, नंतर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यावे. आता गरम तेलात हिंग टाकावा. यानंतर हिरवी मिरची व कांदा घालून चांगले परतून घ्यावे व संपूर्ण मसाले त्यात घालावे. व त्यात एक वाटी पाणी घालून उकळून घ्यावे. पाणी उकळल्यानंतर त्यात बोर घालून गेस बंद करावा व कोथिंबीर घालून गरमा गरम सर्व्ह करावी.