साहित्य : 2 कप पायनेपल (काप केलेले), 1/2 चमचा जिरं, 1 लवंग, 1 तुकडा दालचिनी, 1 मोठी वेलची, मीठ चवीनुसार, 1/2 चमचा तिखट, 1/2 चमचा गरम मसाला, 1 कांदा, 1 हिरवी मिरची, 1 मोठा चमचा साखर, 2 मोठे चमचे तेल, कोथिंबीर, कढीपत्ता, 1 मोठा चमचा क्रीम, 1/2 चमचा मोहरी.
कृती : सर्वप्रथम कांदा व हिरवी मिरची बारीक कापून घ्यावे. आत प्रेशर कुकरमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी-जिऱ्याची फोडणी द्यावी व त्यात लवंग, वेलची व दालचिनी घालून चांगले परतून घ्यावे. नंतर त्यात कांदे, हिरवी मिरची, कडीपत्ता गुलाबी होईपर्यंत परतावे. मग काप केलेले अननसचे तुकडे मीठ, तिखट व गरम मसाला घालून 2 मिनिट परतून त्यात 2 कप पाणी घालून कुकर बंद करून 5 मिनिट शिजवावे. भाजी शिजून झाल्यावर त्यात साखर घालावी व क्रीम व कोथिंबीर घालून गरम गरम सर्व्ह करावी. ही आंबट गोड भाजी फारच रुचकर लागते.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा