Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते ?

saibai bhosale shivaji maharaj wife
, बुधवार, 17 ऑगस्ट 2022 (15:46 IST)
सईबाई भोसले या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी आणि छ्त्रपती संभाजी महाराजांच्या आई होत्या. त्यांचा जन्म २९ ऑक्टोबर १६३३ रोजी फलटण येथे झाला होता.
 
सईबाईंचे या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील माधोजीराव नाईक निंबाळकर यांच्या पुत्री होत्या. त्यांच्या आईचे नाव रेऊबाई निंबाळकर असे होते. निंबाळकर तंजावरच्या पवार कुळातील घराणे आहे. सईबाई यांना तलवार बाजीची आवड होती. काही पुस्कांप्रमाणे त्या दिसायला रेखीव होत्या. स्वभावाने त्या शांत, अतिशय समजूतदार होत्या.
 
सईबाई यांचा विवाह शिवाजीमहाराजांशी लालमहाल येथे १६ मे १६४० रोजी झाला. त्यावेळी शिवाजी महाराजांचे वय ११ वर्षे तर सईबाईंचे वय ७ वर्षे होते. त्या शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी होत्या. त्या काळी बालविवाहाची प्रथा होती.छत्रपती शिवाजी महाराज यांना सईबाईंपासून चार अपत्य झाली. तीन मुली आणि धर्मवीर संभाजी राजे. त्यांनी वयाच्या २४व्या वर्षी १४ मे १६५७ रोजी संभाजी महाराजांना जन्म दिला. 
 
शिवाजी महाराज यांची सर्वात प्रिय पत्नी
असे म्हणतात की सई ह्या अत्यंत बुद्धिमान आणि शांत सल्लागार होत्या त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजाना प्रत्येक क्षणी साथ दिली. त्यांचा निस्वार्थ आणि शांत स्वभाव असल्यामुळे कदाचित महाराजांना त्या खूप आवडायच्या. महाराज इतर राण्यांच्या तुलनेत आपला जास्त वेळ त्यांच्या सोबत घालवत असत. सईबाई शिवरायांना सदैव मदत करायच्या मग ते राज्याची असो वा राजवाड्याची.
 
सईबाई यांची मुले
छत्रपती शिवाजी महाराज यांना सईबाईंपासून चार अपत्य झाली. तीन मुली आणि एक मुलगा. सईबाई आणि शिवाजी महाराजांच्या पहिल्या मुलीचे नाव सखुबाई आणि 
 
दुसर्‍या मुलीचे नाव राणूबाई तर तिसऱ्या मुलीचे नाव अंबिकाबाई असे होते. यानंतर, १६५७ मध्ये त्यांना एक मुलगा झाला त्यांचे नाव संभाजी महाराज होते. शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी भोसले १६५४ मध्ये शहीद झाले होते त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचे नाव संभाजीराजे ठेवले.
 
सईबाईंची मुलगी सखुबाई हिचा विवाह १६५७ मध्ये बाळाजीराव निंबाळकर यांचा मुलगा महाडजी यांच्याशी झाला. बाळाजीराव हे निंबाळकर सईबाईंचे भाऊ होते. असे म्हणतात की बाळाजीरावांना औरंगजेबाने त्यांचा धर्म बदलण्यास भाग पाडले होते. त्यानंतर त्यांचा हिंदू धर्म स्वीकारण्यासाठी हा विवाह करण्यात आला. राणूबाईचा विवाह जाधव कुटुंबात झाला तर अंबिकाबाईचा विवाह हरजी राजे महाडिक यांच्याशी झाला. संभाजी राजे भोसले यांचा विवाह येसूबाईशी झाला होता.
 
सईबाईंचा मृत्यू
१६५७ मध्ये सईबाईंनी संभाजींना जन्म दिला. सईबाईंची तब्येत बाळांतव्याधी मुळे खालावली. त्या आजारी पडू लागल्या. १६५९ मध्ये वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी एका आजाराने सईबाईंचा राजगड किल्ल्यात मृत्यू झाला. सईबाईंच्या मृत्यूसमयी संभाजी महाराजांचे वय अवघे दोन वर्षे होते. आईच्या निधनानंतर त्यांचे संगोपन आजी जिजाबाईंनी केले.
 
सईबाईंची समाधी
पुणे येथील राजगड किल्ल्यात सईबाईंची समाधी बांधली गेली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Career In in Advertisement After 12th: अॅडव्हर्टायझिंग मध्ये करिअर कसे करावे,व्याप्ती ,पगार ,पात्रता, कौशल्ये जाणून घ्या