Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कमी झोप घेतल्याने मुलांच्या बौद्धिक वाढीवर परिणाम

कमी झोप घेतल्याने मुलांच्या बौद्धिक वाढीवर परिणाम
, सोमवार, 8 जून 2015 (11:53 IST)
अयोग्य आणि कमी झोप घेतल्यामुळे मुलांच्या बौद्धिक विकासावर विपरीत परिणाम होतो, असे नुकतेच एका संशोधनातून पुढे आले आहे.
 
कॅनडामधील मॉट्रील विश्वविद्यालयातील प्राध्यापक संशोधक रॉजर गॉडबाऊट म्हणाले, हे संशोधन ज्ञानासंबंधित क्षमतांमधील झोपेची महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट करते.
 
हे संशोधन 13 सामान्य आणि 13 न्यूरोटिक मुलांवर केले गेले. झोप घेताना काही अडथळा निर्माण झाल्यास मस्तकातील लहरी बाधित होतात, त्यामुळे मुलांच्या बौद्धिक विकासावर विपरीत परिणाम होतो. 
 
संशोधकांनी दोन्ही गटातील मुलांच्या अभ्यासाअंती असा निष्कर्ष काढला, ज्या मुलांना रात्रभर चांगली झोप मिळते, त्यांचा बौद्धिक विकास वेगाने होतो. गॉडबाऊट म्हणाले की, या संशोधनातून हे सिद्ध झालेय लहान मुले आणि युवकवर्ग झोपेच्या कमतरतेमुळे प्रभावित होतात. याबाबतचे संशोधन ‘साइकोफिजिओलॅाजी’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रकाशित झाले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi