या काळात स्वयंपाकात बनविलेले, बिनतिखटाचे पदार्थ आपल्या हाताने कुस्करून बाळाला भरवावेत. त्यासाठी मिक्सरचा वापर करू नये. थोडे जास्त
शिजविलेले डाळ-भात, कुस्करलेले बटाटे-टोमॅटो, रताळी, तसेच फळेसुद्धा बारीक करून द्यावीत.
बाळाच्या आहारासाठी काही रेसिपीज
खिचडी : तांदूळ चार मोठे चमचे, भाजलेली मु
गाची डाळ १.५ चमचे पाणी टाकून चांगले शिजवावे. पाणी पूर्ण संपण्याआधी दोन मोठे चमचे पालेभाजी, थोडे मीठ टाकावे. शेवटी थोडे जिरे टाकावे.
लापशी : नाचणीचे पीठ चार मोठे चमचे, हरभर्याचे पीठ चार छोटे चमचे, आणि भाजलेली डाळ चार मोठे चमचे, दोन चमचे साखर किंवा गूळ असे सारे पदार्थ एकत्रित मिसळून शिजवावे.
बाजरीचा चुरमा : भाजलेली बाजरी चार चमचे, भाजलेली मुगाची डाळ एक मोठा चमचा, भाजलेले शेंगदाणे दोन छोटे चमचे, भाजलेले तीळ दोन छोटे चमचे असे घ्यावेत. हे सारे व्यवस्थितपणो मिसळून हा चुरमा डब्यात भरून ठेवावा. दर वेळी दोन चमचे मिश्रण दुधात किंवा पाण्यात मिसळून द्यावे.
गेहुना : भाजलेले गहू तीन मोठे चमचे, भाजलेले मूग दोन मोठे चमचे, भाजलेले शेंगदाणे दोन छोटे चमचे, गूळ दोन मोठे चमचे, या सर्व वस्तू वेगळय़ा दळून त्यात गूळ मिसळून गरज असेल तसे वापरावे.