Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाळाला दात येतात तेव्हा!

बाळाला दात येतात तेव्हा!
ND
मुलांमध्ये दात यायची सुरवात 6 ते 8 महिन्यापासून सुरू होते. काही मुलांचे दात उशीरासुद्धा निघतात. दात निघणे हे मुलांच्या प्रकृतीवर अवलंबून असते. जर मुलांचे दात उशीरा येत असतील तर काळजी करण्यासारखे काहीच नसते. बाळाचे आधी खालचे दात येतात नंतर वरचे समोरचे दात येतात.

* मुलांचे दात निघणे सुरू होतात तेव्हा त्यांच्या हिरड्यांवर सूज येऊन त्यात खाज सुटते, म्हणून मुलं चिडचिडी होतात. या वेळेस मुलं
बोटं नेहमी तोंडात टाकत राहतात.

*या काळात मुलं आपल्या आजूबाजूची कुठलीही वस्तू दिसली की तोंडात घालतात म्हणून सर्वात जास्त महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे
लक्ष देणे गरजेचे आहे.

webdunia
ND
* बाळाला जेव्हा दात निघण्यास सुरूवात तेव्हा त्यांना हगवणं लागते, आणि त्यामुळे ते अस्वस्थ होतात तर त्या वेळेस त्यांच्या
खाण्या-पिण्याची व्यवस्थित काळजी घ्यावी.

* आमच्या तोंडात किटाणू नेहमीच उपस्थित असतात. मुलांना जेव्हा दात नसतात तेव्हा त्यांच्या तोंडात हे कमी प्रमाणात असतात, पण जसं मुलांचे दात निघण्यास सुरूवात होते त्यात कीटाणुंची वाढ होते व त्यामुळे बाळाचे पोट खराब होतं व त्यांना जुलाब होतात. पण हळू हळू मुलांमध्ये प्रतिरोधक क्षमता वाढते आणि तेव्हा त्यांचं पोट ठीक होऊन त्यांचा सर्वांगीण विकास होऊ लागतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi