भाज्या खाण्याकडे मुलांचा कल वाढवा!
घरात केलेल्या विविध भाज्यांपेक्षा बाहेरचे आकर्षक, चटपटीत खाण्याकडे मुलांचा कल असतो. त्यामुळे पोषक आणि जीवनसत्त्वे असूनही केलेल्या भाज्यांची चव मुलांना कळत नाही. बाहेरच्या खाद्यपर्थांमध्ये जीवनसत्त्वांचा अभाव असतो. मग अशा वेळी शरीराच्या विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार्या भाज्या खाण्याकडे मुलांचा कल वाढवा, यासाठी त्या भाज्यांना आकर्षक नावे द्या, असे मत संशोधकांनी मांडले आहे. पाळीव प्राण्यांना आपल्या आवडीची नावे देण्याची पद्धत आहे. कुत्र्याला 'मोती', मांजरीला 'मनी माऊ' इतकेच काय पण घरातील शोभिवंत माशांनाही आवडीची नावे देण्याची पद्धत आहे. आपली जवळीत आणि आपुलकी दाखवण्यासाठी अशी नावे देण्याची पद्धत आहे. याच पद्धतीचा वापर भाज्यांसाठी केला तर मुलांची आणि भाज्यांची मैत्री होते त्यांचा भाज्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि त्यामुळे मुलांना हवी असलेली पोषकद्रव्येही मिळतात, असे केलेल्या प्रयोगात आढळले आहे. मुलांना पोषष आणि आरोग्यपूर्ण भाज्यांचा अस्वाद घेता यावा, यासाठी त्या भाज्यांना आकर्षक नावे द्या. जुनीच पालेभाजी किंवा फळभाजी नव्या नावाने मुलांसमोर मांडा. त्यातील जीवनत्त्वांचा त्या भाज्यांच्या नव्या नावाशी मेळ घातला तर मुलांना ती भाजी खाण्यात मजा येते. त्यामुळे मुले ती भाजी पुन:पुन्हा आवडीने आणि चवीने खातात, असे आढळले आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील कॉरनेल विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत अनेक प्रयोग केले. तीन शाळांतील 8 ते 11 वयोगटातील 147 मुलांचा या प्रयोगांमध्ये समावेश करण्यात आला होता. न्यूयॉर्कमध्ये शाळांमध्ये मुलांना 'फूड ऑफ द डे'च्या माध्यमातून दरदिवशी आहार दिला जातो. त्यात विविध भाज्यांचा समावेश असतो. संशोधकांनी विडलेल्या तीन शाळांसाठी दोन महिन्यांच्या कालावधीत हा प्रयोग केला. गाजराला एक्स-रे व्हिजन कॅरट्स' असे नाव दिले. ब्रोकोलीला 'पावर बंच ब्रोकोली' तर हिरव्या शेगांना 'सिली डिली ग्रीन बीन्स'असे नाव देण्यात आले. मुलांना शाळेतून देण्यात येणार्या आहारात या पालेभाज्या आणि फळभाज्यांचा समावेश करण्यात आला.