Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुलांमध्ये वाढणारा लट्ठपणा

मुलांमध्ये वाढणारा लट्ठपणा
ND
आजकाल मुलांमध्ये लट्ठपणाची सवय वाढून राहिली आहे, यावर फक्त मुलांचे आई-वडीलच रोख लावू शकतात. त्यांचे खान-पान त्यांच्या दिनचर्येत काही गोष्टींचा समावेश केला पाहिजे ज्याने लट्ठपणा त्यांना आपला शिकार बनवू शकणार नाही.

असं लक्षात आलं आहे की मुलं जेवढी केलोरी ग्रहण करतात पण ती खर्च होत नाही. आजकाल मुलं शाळेतपण पायी पायी किंवा सायकलने जात नाही, जास्त व्यायाम पण करत नाही, ते शाळेतून आल्यावर टी. व्ही समोर बसून राहतात किंवा कॉम्प्युटरवर गेम्स खेळण्यात आपला वेळ घालवतात त्याने त्यांच्यात लट्ठपणा वाढतो.

शारीरिक व्यायाम जसे जागिंग, धावणं किंवा खेळ खेळणे इत्यादी मुलांसाठी फारच गरजेचे आहे, जवळ पास कुठे जयाचं झालं तर
मुलांना पायी पायी घेऊन जायला पाहिजे.

मुलांना आठवड्यात एक वेळा पार्क, प्राणी संग्रहालय किंवा म्युझियममध्ये घेऊन जायला पाहिजे, जेथे पायी पायी चालण्यात सुद्धा आनंदाचा अनुभव होतो. पार्कमध्ये त्यांच्यासोबत फ्रिस्बी व इतर खेळ खेळू शकता.

घरातील हलके फुलके कामं मुलांकडून करून घ्यायला हवे. जसे गाडी धुणे, भिंतींची स्वच्छता करणे स्वत:चे कपडे धुणे, साफ सफाई
करणे इत्यादी. ह्या कामात त्यांना आनंद पण होतो आणि तुमचा साथपण मिळतो. टी. व्ही बघायची वेळ ठरवून घ्यावी. व रात्रीच्या
जेवणानंतर पूर्ण परिवारासोबत फिरायला जाणे.

ह्या गोष्टींकडे लक्ष दिले तर पाहा मुलांमध्ये लट्ठपणा न दिसून त्यांचा विकास व्यवस्थित होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi