एका नव्या संशोधनाप्रमाणे दोन वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांसाठी दुपारची झोप हानिकारक ठरू शकते. याने त्यांच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होऊ शकतो. याव्यतिरिक्त दुपारच्या झोपेमुळे मुलांच्या रात्रीच्या झोपण्याची वेळदेखील प्रभावित होते.
ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीचे संशोधक करेन थॉर्प यांनी सांगितले की त्यांची टीम हा शोध लावत होती की मुलांच्या दुपारच्या झोपेमुळे त्यांच्या रात्रीच्या झोपेची गुणवत्ता, त्यांच्या व्यवहारात आणि शारीरिक आरोग्यावर काय परिणाम होतो.
संशोधनात कळले की शरीराचे योग्य विकास, व्यवहार आणि पूर्ण आरोग्यावर पडणारे हानिकारक प्रभावासाठी दुपारची झोपदेखील कारणीभूत आहे.हे जर्नल 'अर्काइव्स ऑफ डिजीज इन चाइल्डहुड'च्या ऑनलाईन आवृत्तीत प्रकाशित झाले आहे.