Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लहान मुलांचा लंच बॉक्स

लहान मुलांचा लंच बॉक्स
ND
वाढत्या मुलांचा टिफीन आरोग्यवर्धक असायला पाहिजे. यासाठी मुलांना पौष्टिक जेवण देणे गरजेचे आहे. लंच बॉक्समध्ये देण्यासारख्या बर्‍याच गोष्टी असतात. पण त्या कधी आणि केव्हा द्यायला पाहिजे? यासाठी सर्वांत चांगले म्हणजे संपूर्ण आठवड्याचे एक मेन्यू कार्ड तयार करून घ्यावे. त्यामुळे टिफीन बनवताना सरळ व सोपे जाईल.

सोमवार : पनीर, चीजचे चांगले कीस करून त्याचे परोठे किंवा धिरडे करून द्यावे. पनीरामध्ये प्रोटीन व कॅल्शियम असतात.

मंगळवार : मोड आलेले कडधान्य जसे मूग, चणे फ्राय केलेले किंवा सँडविज बर्गरमध्ये भाज्या भरून देऊ शकता. यातसुद्धा भरपूर
प्रमाणात प्रोटीन असतात.

बुधवार : डाळींना भिजवून त्याची पेस्ट करून त्याचे टिकिया किंवा धिरडी बनवून द्यावे. या टिकियांना ब्रेडच्या मधोमध ठेवून किंवा चटणीसोबतसुद्धा देऊ शकतो.

गुरुवार : हिरव्या भाज्या जसे कोबी, मटर, पालक, मेथी इत्यादींचे परोठे बनवून द्यावे. कडधान्यांना उकळून बर्गर किंवा पिझ्झ्यामध्ये घालून
द्यावे. मुलांना वेग वेगळी चव फारच आवडते.

शुक्रवार : किसलेले गाजर, उकळलेले अंड्यांचे स्लाइस सँडविजमध्ये भरून द्यावे. हिरव्या भाज्या काकडी, टोमॅटो इत्यादीसुद्धा भरून देऊ शकता. अंडीत कॅल्शियम आणि मिनरल्स असतात.

शनिवार : चव बदलण्यासाठी एक दिवस मुलांना ताजी फळंसुद्धा देऊ शकता. फळ बदलून द्यावे. काही वेळा मुलांना फळांना सोलून
खाण्याचा कंटाळा येतो, म्हणून संत्र्यांची सालं काढून, चिकूचे दोन काप करून देऊ शकता. या व्यतिरिक्त लहान मुलं कुठल्याही वस्तूंची
आकृती पाहून त्याकडे आकर्षित होतात. म्हणून त्यांचा लंच बॉक्स आकर्षक असायला हवा. बॉक्समध्ये एक लहान चमचा सुद्धा द्यायला पाहिजे.

मुलांना आवडत असेल आणि शाळेत चालत असेल तर त्यांना टिफीन सोबत हेल्थ ड्रिंक्स बनाना शेक, ऑरेंज ज्यूस सुद्धा देऊ शकता.

उन्हाळ्यात लहान मुलांच्या पाण्याच्या बाटलीत ग्लूकोजचे पाणी द्यायला पाहिजे.

मुलांसाठी भाजी तयार करताना नेहमी मिक्स भाजी द्यावी. यात गाजर, टोमॅटो, काकडी, मटर इत्यादी भाज्या असाव्यात.

मुलांना बिस्किट किंवा चिप्सचे पॅकेट देणे टाळावे. त्याच बरोबर चॉकलेट इत्यादीसुद्धा कमीत कमी द्यावे. हे सर्व खाद्य पदार्थ हाय कॅलरी आणि लो न्यूट्रिलियन्स असतात.

टिफिनमध्ये ब्रेड देताना त्यांचे प्रकार बदलत राहावी. उदा. फ्रूट ब्रेड, बन, फ्लॅट ब्रेड, माफीनं, पिकलेटस, क्रिस्पब्रेड, राईस केक इत्यादी.

Share this Story:

Follow Webdunia marathi