थंडीत लहान मुलं विविध विकारांना बळी पडतात. सर्दी, खोकला, नाक गळणं, घसा बसणं या तक्रारी या काळात नित्याच्या होऊन बसतात. हे टाळण्यासाठी या काळात मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची गरज असते. मुलं तंदुरुस्त राहावी, यासासाठी थोडी काळजी घ्यावी लागते. थंडीत मुलांना जपण्याच्या या काही टिप्स...
*वेफर्स, बर्गर, नूडल्ससारख्या तेलकट फास्टफूड ऐवजी मुलांना पौष्टिक न्याहारी द्या. फळं पालेभाज्या, डाळी यांचा आहारात समावेश करा.
* मुलांना उन्हात पाठवा यामुळे त्यांना ड जीवनसत्त्व मिळेल आणि हाडं बळकट होतील.
* खाण्याआधी मुलांना हात स्वच्छ धुवू द्या.
* रात्री बदाम भिजवून ठेवा. सकाळी गरम दुधात घालून द्या.
* मुलांना मैदानी खेळ खेळू द्या. यामुळे त्यांच्या शरीराचा विकास होईल. ती सक्षम बनतील.
* मुलांना गरजेपेक्षा जास्त गरम कपडे घालू नका.
* न धुतलेले स्वेटर फार काळ घालू देऊ नका. या स्वेटरमध्ये धूळ आणि जंतूंचा वास असतो. यामुळे तब्येत बिघडू शकते.