Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाळ रडत असल्यास मदत घ्या रिफ्लेक्सोलॉजीची

बाळ रडत असल्यास मदत घ्या रिफ्लेक्सोलॉजीची
काय झालं? बाळं रडत होत! हे प्रश्न आणि त्यांच उत्तर बर्‍याच घरांमध्ये ऐकायला मिळतं. तान्हं बाळं तळतळून रडत असतं पण ते कशामुळं रडतंय हेच समजत नसतं. मग ते रडूनरडून दमतं आणि झोपी जातं. मात्र या सगळ्यात त्याची बरीच शक्ती खर्ची पडते. हे टाळायचं असेल तर बाळाला गप्प करायला हवं. एका साध्या उपायाने हे वरकरणी कठीण वाटणारं काम सोपं होऊन जातं. बघूया कसं ते! 
 
बाळ रडण्यामागे बरीच कारणं असतात. कदाचित ते भुकेले असतं, थकलेलं असतं अथवा त्याला वेदना जाणवत असतात. मोठी माणसं नेमकं काय होतंय हे सांगू शकतात पण पोट दुखतयं, गॅसेस झाल्याने बैचेन होतंय, नाक चोंदल्याने श्वास घेता येत नाहीये, डोकं दुखतंय अशा कोणतीही तक्रारी लहानगे करू शकत नाही. त्यांना एकच भाषा अवगत असते ती म्हणजे रडणं... ते भोकाड पसरुन मोकळे होतात. अशा वेळी आईने घाबरुन जाऊ नये. बाळ अस्वस्थ आहे असं जाणवताच त्याचे पाय दाबावे. बाळाच्या तळपायावरील काही पॉईंट्स दाबले असता ते शांत होतं. वैद्यकीय भाषेत यास रिफ्लेक्सोलॅजी असं म्हणतात. ही एक हीलिंग पद्धती आहे. चिनी वैद्यक शास्त्रामध्ये पूर्वापार याचा वापर होत असलेला दिसतो. तळपायावरील काही पॉईंट्सवर दाब दिल्यास अनेक व्याधीही दूर होतात असं हे शास्त्र सांगतं. यामुळे शरीरात सकारात्मक परिवर्तन घडतं आणि वेदना कमी होतात. म्हणूनच बाळ रहू लागल्यावर त्याचा तळपायावर हलक्या हाताने जवळपास तीस मिनिटे दाबावं. तळपायाच्या मध्यभागी दाब द्यावा. या उपायामुळे बाळाच्या पोटातील गुबारा कमी होतो. डोकेदुखी शमते आणि बाळ आरामात झोपून जातं. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

म्हणून करा स्वीमिंग