Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आला उन्हाळा...मुलांना सांभाळा...

- सुश्रुत जळूकर

आला उन्हाळा...मुलांना सांभाळा...
सर्वत्र उन्हाळा सुरू झाला असून, काही भागात मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत तर काही ठिकाणी लवकरच लागणार आहेत. परिक्षा संपल्यानंतर पालक आणि मुलं दोघेही...सुटलो बुवा...असा सुटकेचा निश्वास सोडतात. मुलं सुद्धा दिवसभर खेळतात, हुल्लडबाजी करतात, मस्ती करतात, मामा, काका, आजोळी जाण्याचे प्लॅन होतात आणि जातात. मुलांचं हे वयंच खेळण्याचं आहे, त्यांना बिनधास्त खेळू द्या, त्याशिवाय त्यांच्या शरीराची चांगली वाढ कशी होणार?

webdunia
 
ND
मुलांना अगदी माती, रेतीतही खेळू द्या, किंबहुना क्रिकेट खेळताना चेंडू घाणीच्या ठिकाणी पडला तरीही तिथून चेंडू काढू द्या...फक्त यानंतर घरात येण्यापूर्वी हात स्वच्छ धुवायला सांगा आणि तशी खात्री करा. दुपारी खेळताना सावलीत अथवा घराच्या पडवीत, ओसरीवर, वाड्यात सावली देणार्‍या झाडाखाली बसून खेळायला, शक्यतो बैठे खेळ खेळायला सांगा. अनेक मुलांना उन्हाळ्यात नाकातून रक्त येण्याचा त्रास सुद्धा होतो, यासाठी जेवणात कांदा, काकडी आदी फळांचा उपयोग करा, मात्र तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या..उन्हाळ्यात बाजारपेठेत येणारी टरबूज, खरबूज, आंबा, संत्री, मोसंबी अशी वेगवेगळी फळं नक्की द्या...आपण स्वतः सुद्धा मुलांबरोबरच उन्हापासून बचावाची काळजी घ्यायला विसरू नका!

Share this Story:

Follow Webdunia marathi