थंडीत बाळाच्या आरोग्याची काळची घ्या !
थंडीत बाळाला गरम केलेलं कोमट पाणी प्यायला देणे हितावह ठरते. थंडीत बाळाला उबदार कपड्यात लपेटावे.प्रसंगी गरम कपड्याने शेक द्यावा. चेहर्याला सकाळी दुधाची साय लावल्यास बाळाचा चेहरा उजळतो.तळहात, तळपायाला ज्येष्ठमध, दूध व तिळाचे तेल लावल्यास तळहात व तळपायही सुंदर राहतात.लहान मुलांना या काळात शिंगाड्याचे पदार्थ द्यावेत, त्याचा फायदा होतो.बाळाला या काळात सूर्याच्या कोवळ्या किरणांचेही स्नान घाला.थंड पदार्थ खायला देऊ नयेत.