निरागसता असें जेथे, ओतप्रोत भरली,
बालक असण्याची तीच खरी ओळख भली,
ना भेदभाव न कपट मनी कधी वसे,
निर्झरा परी खळखळ त्याचं हसणं असें,
काळ गोरं न कधी मनी ,हेंच खरे,
कोठेही असो, तयांचे नसतील नखरे,
म्हणून च कदाचीत "चाचा"ना ते आवडे,
रमून जाती त्यांच्या सवे तेही सगळीकडे ,
लहान मुलं जणू आहे रुप देवाचे,
हेंच म्हणणे असेल माझे अन सर्वांचे!
....अश्विनी थत्ते