Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बालदिन विशेष नोव्हेंबरमध्ये पोगो तर्फे विशेष कार्यक्रम

बालदिन विशेष नोव्हेंबरमध्ये पोगो तर्फे विशेष कार्यक्रम
मुंबई , शनिवार, 12 नोव्हेंबर 2016 (12:39 IST)
'माइटी राजू - असली हिरो कौन' आणि 'अप्पू - द योगिक एलिफंट' या शोज चे पोगोवर प्रीमियर 
 
बाल दिन हा खास बालकांसाठी विशेष दिवस म्हणून ह्या नोव्हेंबर महिन्यात जगभर साजरा केला जातो. ह्या चिमुकल्यांसाठी मनोरंजनाचे विश्व ठरलेल्या पोगोने आपल्या सर्व चाहत्यांचे संपूर्ण महिनाभर मनोरंजन करायचे ठरवले आहे ! यंदाचा बालदिन, पोगो तर्फे खास कार्यक्रम आणि सुखद आश्चर्य देऊन साजरा केला जाणार आहे. ७ नोव्हेंबरपासून 'टॉम आणि जेरी' दररोज रात्री ८ वाजता नव्या एपिसोडद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करतील, तर १४ नोव्हेंबर २०१६ रोजी दुपारी ३ वाजता 'छोटा भीम बच्चा पार्टी विथ हिज फ्रेंड्स इन ढोलकपूर' या एपिसोडद्वारे बालदिनाचे सेलिब्रेशन सुरू होईल. भीम ढोलकपूर आणि त्याचे मित्र छुटकी, कालिया, ढोलू भोलू व इंदुमती यांच्या भरपूर गोष्टी सांगेल त्यामुळे छोटा भीमबरोबर सेलिब्रेशन व त्याचा सिनेमा हा महिना आणखी खास बनवतील. 
 
वीकेंडची मजा आणखी वाढावी यासाठी मायटी राजू नवीन मूव्‍ही ‘असली हिरो कौन?’ या सिनेमात दिसणार असून तो २० नोव्हेंबर २०१६ रोजी सकाळी १०.३० वाजता दाखवला जाणार आहे. या सिनेमात माइटी राजू गॅलेक्सी ए मधून आलेल्या खर्जान या दुष्ट खलनायकाशी लढताना दिसेल. खर्जान हा आकाशगंगेतील तुरुंगातून निसटलेला असतो आणि त्याच्या शोधासाठी अंतराळातून तीन सुपरहिरो पृथ्वीवर येतात. त्यामुळे मायटी राजूला रुपांतर करून युद्धात भाग घ्यावा लागतो आणि खर्जानचा सामना करावा लागतो. पुढे काय होते? हे पडद्यावरच पाहणे योग्य ठरेल!
 
या मजामस्तीमध्ये भर घालण्यासाठी 'अप्पू द योगिक एलिफंट' हा नवा शो २६ नोव्हेंबर २०१६ या दिवशी लाँच होणार असून तो दर शनिवार आणि रविवारी सकाळी ८.३० वाजता पाहायला मिळेल. अप्पू हे योगिक हत्तीचे पिल्लू नीना नावाची मुलगी आणि तिचा पाळीव कुत्रा टायगर यांच्याशी दोस्ती करतो. मैत्री आणि धाडसाच्या आधारे ही तिघे साहसी सफरीला जातात. तो कपाळावर तीन बिंदू आणि अमर्याद ताकद असलेला सुपरहिरोसुद्धा असतो. त्याला दर दिवशी आपल्या योगिक शक्तींची माहिती होत असते. इतकेच नाही, तर हा महिना अधिकाधिक चांगला बनवण्यासाठी पोगोने पालकांना मुलांसाठीच्या त्यांच्या शुभेच्छा देण्याची आणि भीम बच्चा पार्टी एपिसोडमध्ये सहभागी होण्यासाठी संधी देऊ केली आहे. यासाठी केवळ त्यांना आपल्या शुभेच्छा चॅनेलकडे पाठवाव्या लागतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चाचा नेहरु (मुलं देवा घरची फुलं)