Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चौथ्या दिवशीही भारताचे वर्चस्व!

चौथ्या दिवशीही भारताचे वर्चस्व!

वेबदुनिया

कॉमनवेल्थ गेम्सच्या चौथ्या दिवशीही भारतीय खेळाडूंचा दबदबा दिसून येत आहे. आज सकाळीच भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण पदक तर कुस्तीत रौप्य व तिरंदाजीत एक कांस्य पदक मिळाल्याने भारताची दमदार सुरुवात झाली आहे.

आता भारताच्या खात्यात 26 पदकं झाली असून, यात 12 सुवर्ण पदकांचा समावेश आहे.

आज नेमबाजीत भारताच्या विजय कुमार व गुरप्रीत सिंह यांनी पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले.
दुसरीकडे मलेशियन तिरंदाजांना पछाडत भारताच्या भाग्यवती चानू, झानू हंसदा व गगनदीप कौरने कांस्य पदक जिंकले. या स्पर्धेत गगनदीपने शानदार खेळ केला.

महिलांच्या कुस्तीत गीताने नायजेरीयन खेळाडू लोविना ओडोहीचा पराभव करत भारताला 55 किलो वजनी गटात रोप्य पदक मिळवून दिले.

Share this Story:

Follow Webdunia marathi