कॉमनवेल्थ गेम्सचा आता आणखी एक वाद निर्माण झाला आहे. गेम्समध्ये सहभागी होण्यासाठी निवडण्यात आलेल्या तीन भारतीय सायकलपटूंना वगळण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
त्यांच्या प्रशिक्षकानेच हा निर्णय घेतल्याने सार्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून, भारतीय सायकलिंग महासंघाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे संकेत दिले आहेत.
दिल्लीत भारतीय सायकलिंग संघात 27 खेळाडूंची निवड करण्यात आली होती. परंतु आता अचानक पंजाबमधील तीघांचे नाव यातून वगळण्यात आले आहे.