दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय खेळाडूंचे शानदार प्रदर्शन सुरू आहे आणि ते पहिल्या दिवसापासूनच ऑस्ट्रेलियानंतर पदक तक्त्यात दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे, परंतु आज त्यांना पद तालिकेत दुसऱ्या क्रमांकावर राहण्यासाठी इंग्लंड सोबत स्पर्धा करावी लागणार आहे.
भारत आतापर्यंत 20 सुवर्ण, 16 रौप्य आणि 12 कांस्य पदकांसहित एकूण 48 पदक जिंकला आहे, जेव्हाकी इंग्लंडची एकूण पदक संख्या जरी 70 असली तरी 19 सुवर्ण पदकांसहित तो सुवर्ण पदकांच्या बाबतीत भारताच्या मागेच आहे. ऑस्ट्रेलिया 47 सुवर्ण पदकांसहित पदतक्तेत शीर्ष स्थानावर कायम आहे.
आज भारताला टेनिस, कुस्ती, फ्री स्टाइल, शूटिंग आणि टेबल टेनिसमध्ये पदकांची आशा आहे. भारताची टेनिस सनसनी सानिया मिर्झा आज टेनिसच्या महिला एकलं स्पर्धेच्या फायनलमध्ये सुवर्ण पदकासाठी खेळणार आहे. या व्यतिरिक्त आज भारतीय खेळाडू तीरंदाजी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, शूटिंग आणि जलतरण स्पर्धेत भाग घेणार आहेत.
गगन नारंगकडून आज परत सुवर्ण पदकाची आशा आहे. (वेबदुनिया न्यूज)