कॉमनवेल्थ गेम्समध्ये सामना रंगत आहे तो भारत व इंग्लंडमध्ये. पदक तक्त्यात दुसर्या क्रमांकासाठी भारत व इंग्लंडमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. सलग पाच दिवस दुसर्या क्रमांकावर राहिल्यानंतर भारताच्या रँकिंगमध्ये घसरण झाली होती. आता पुन्हा भारत दुसर्या क्रमांकावर आला आहे.
आज 13 सुवर्ण पदकांसाठी लढाई होत असून, यात भारताचे पारडे जड मानले जात आहे. भारताने आतापर्यंत 29 सुवर्ण,22 रौप्य तर 22 कांस्य पदकावर कब्जा केला आहे. दुसरीकडे इंग्लंने 25 सुवर्ण, 45 रौप्य व 30 कांस्य पदक कमावले आहेत. ऑस्ट्रेलियाचे या गेम्स मधील निर्विवाद वर्चस्व अद्यापही कायम असून, कांगारु पहिल्या क्रमांकावर आहेत.