मागील 15 दिवसांपासून सुरु असलेल्या कॉमनवेल्थ गेम्सचा आज समारोप होत आहे. उद्घाटन समारंभाने सार्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. बीजिंगमध्ये झालेल्या ऑलिंपिकशी याची तुलना केली गेली. आता याहीपेक्षा शानदार समारंभ आज सांगता सोहळ्यात होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
आज होणार्या समारोहात सात हजार कलाकार सहभागी होणार असून, चार टप्प्यांमध्ये त्यांचे विभाजन करण्यात आले आहे.
शंकर महादेवन, सुनिधी चव्हाण, कैलाश खेर, सुखविंदर यांसारखे गायकही यात आपली कला सादर करणार आहेत. दुसरीकडे पाच प्रमुख डीजेंची जुगलबंदीही यात सादर केली जाणार आहे. तिसर्या टप्प्यात जवळपास एक हजार डांसर आपली कला सादर करणार आहेत.
भारतातील मार्शल आर्टस् ही या दरम्यान सादर केले जाणार असून, भारतीय संस्कृतीची झलकही या सोहळ्यात जगाला दिसणार आहे.