खेळ ग्रावातील फ्लॅटचे काम 80 टक्क्यांपर्यंत पूर्ण करण्यात आले असून, लवकरच हे फ्लॅट्स पूर्णपणे तयार असतील असे मत नियोजन आयोगाचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी व्यक्त केले आहे.
खेळ ग्राममध्ये करण्यात आलेले काम चांगले असून, यात कोणत्याही बाबतीत भ्रष्टाचार करण्यात आला नसल्याचे कलमाडी यांनी म्हटले आहे.
खेळ ग्राममध्ये मोठ्या प्रमाणावर अव्यवस्था असल्याचा आरोप चुकीचा असून, अशाने देशाचे नाव खराब होत असल्याचे कलमाडींचे म्हणणे आहे.