Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गेम्सला येणार्‍या प्रेक्षकांना खास सूचना

गेम्सला येणार्‍या प्रेक्षकांना खास सूचना

वेबदुनिया

आजपासून राजधानी दिल्लीत कॉमनवेल्थ गेम्सना सुरुवात होत आहे. गेम्सला येणार्‍या प्रेक्षकांसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने काही खास सूचना दिल्या आहेत.

1.ओपनिंग सेरेमनी सुरु होण्‍यापूर्वी प्रेक्षकांनी आपल्या जागी स्थानापन्न व्हावे.
2.तिकिट, निमंत्रण पत्रिका किंवा एक्रेडेशन कार्ड सोबत बाळगावे.
3.प्रेक्षकांची चेकिंग केली जाणार असल्यानेत त्यांनी सुरक्षा रक्षकांना या कामी सहकार्य करावे.
4.स्टेडियममध्ये कोणत्याही प्रकारचे ए‍कत्रिकरण करु नये. जमाव जमवून बसू नये.
5.स्वत:च्या आसन क्रमांकावरच बसावे.
6. ज्या गाड्यांना पास देण्यात आला आहे, केवळ त्याच प्रेक्षकांना त्यांच्या गाड्या मैदानाच्या पार्किंगमध्ये लावण्‍याची परवानगी देण्‍यात आली आहे.
7. मैदानावर सिगारेट, मद्य, टिफिन, खाण्‍याच्या वस्तू नेण्‍यास मनाई असल्याने स्टेडियम बाहेरच या वस्तू ठेवाव्यात.
8. लेजर, छत्री, कॉलेज बॅग नेण्यास स्टेडियमवर मनाई असल्याने प्रेक्षकांनी अशा प्रकारच्या वस्तू स्वत:जवळ बाळगू नयेत.
9.ओपनिंग सेरेमनी सुरु होण्‍याच्या काही तास आधी प्रेक्षकांनी मैदानावर प्रवेश करावा.
10. स्टेडियमवर सुरक्षा रक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

अशा सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने स्टेडियमवर येणार्‍या प्रेक्षकांसाठी जाहीर केल्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi