Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गोल्ड मेडल विजेत्या चानूचा अपमान

गोल्ड मेडल विजेत्या चानूचा अपमान
नवी दिल्ली , गुरूवार, 7 ऑक्टोबर 2010 (13:38 IST)
कॉमनवेल्थ गेम्स मधक्षल ढिसाळकारभाराचा प्रत्यय पुन्हा एकदा भारतीय खेळाडूंना आला. गोल्ड मेडल मिळवून तासभरही झाला नाही, तर अधिकार्‍यांमुळे भारताच्या स्टार वेटलिफ्टर रेनू चानूला अपमानित व्हावे लागले.

सामना संपल्यानंतर चानूने घरी जाण्‍यासाठी नियोजन समितीकडे गाडीची मागणी केली होती. तासभर उलटल्यावरही तिला गाडी न मिळाल्याने तिला चक्क ऑटो करुन घरी जावे लागले.

चानू सोबत तिच्या कुटुंबातील इतर सदस्यही होते. त्यांनी झाल्याप्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली असून, समितीच्या अशा वागण्याने इतर खेळाडूंची निराशा होण्‍याची भिती व्यक्त केली जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi