बॅडमेंटनमध्ये भारताला गोल्ड मेडल
नवी दिल्ली , गुरूवार, 14 ऑक्टोबर 2010 (14:11 IST)
कॉमनवेल्थ गेम्समध्ये आज भारताला आणखी एक सुवर्ण पदक मिळाले आहे. बॅडमेंटनमध्ये ज्वाला गुट्टा व अश्विनीने भारताला हे सुवर्ण पदक मिळवून दिले. महिला दुहेरी गटात भारताला हे पदक मिळाले असून, भारताच्या गोल्ड मेडलची संख्या आता 37 वर गेली आहे. भारताच्या या महिला जोडीने सिंगापूरच्या सारी सिंता मूलिया व याओ लेई की या जोडीला 21-16,21-19 असे पराभूत केले.