आज कॉमनवेल्थ गेम्सचे उद्घाटन केले जाणार आहे. अनेक महत्वाच्या व्यक्ती आज राजधानी दिल्लीत दाखल होत असल्याने आज दिल्ली बंद करण्यात आली आहे.
शहरातील मॉल्स, दुकाने, इतकेच काय तर वाहनांनाही रस्त्यावर न येण्याचे आदेश देण्यात आले असून, प्रत्येक चौकात पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
14 ऑक्टोबर रोजीही अशाच प्रकारे बंद पाळला जाणार असून, रुग्णालये, मेडिकल स्टोअर्स मात्र उघडी असणार आहेत.