गेल्या दोन दिवसांपासून विश्वासमत ठरावादरम्यान ज्या पध्दतीने सत्ताधारी व विरोधी पक्षांकडून सभागृहात गोंधळ घातला जात आहे. तो निंदनीय आणि खेदजनक आहे. सभासदांना वारंवार सांगून व ताकीद देउनही कुणीही त्याची दखल घेत नाही हे निश्चितच दुःखद आहे. लोकशाहीच्या वास्तूला अशा प्रकारच्या हालचालींनी बदनाम करू नका असे सांगताना सभापती सोमनाथ चॅटर्जी यांनी व्यथित होउन आपण आजवर पाहिलेली ही सर्वांत खराब लोकसभा असल्याची टीका केली.
गेल्या दोन दिवसांपासून विश्वासमत ठरावादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांच्या बाजूने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असून एकमेकांना बोलण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. सभापती सभासदांवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांना वारंवार सूचना देत असतानाही सदस्यांचा सभागृहात गोंधळ सुरूच होता. त्यामुळे अखेर सभापतींनी आपला राग व्यक्त केला.