Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आणखी काही खासदारांचा सपाला रामराम

आणखी काही खासदारांचा सपाला रामराम
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार वाचविण्यासाठी मदतीला धावून आलेल्या समाजवादी पक्षाच्या (सपा) तीन बंडखोर खासदारांनी बहुजन समाजवादी पार्टीच्या (बसपा) नेत्या व उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावतीं यांची भेट घेतली.

या भेटीनंतर आणखी काही खासदार सपाला रामराम ठोकणार असल्याचा दावा या खासदारांनी केला. सपाचे दहा खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असून विश्वासदर्शक ठरावाविरूद्ध ते मतदान करणार असल्याचा दावा सपा नेते मुनव्वर हसन यांनी केला आहे.

पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी विश्वासदर्शक ठरावापूर्वीच आपला राजीनामा द्यायला पाहिजे. मायावतींच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकार पाडणार असल्याचा विश्वासही हसन यांनी व्यक्त केला.

हसनसहित अन्य दोन बंडखोर खासदार राजनारायण बुधोलिया व जयप्रकाश रावत यांनी आज सकाळी मायावतींची भेट घेतली असली तरी सपा नेते मुलायमसिंग यादव यांनी पक्षात एकजूट असल्याचे सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi