Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

....एकही नेता खासदार नाही

....एकही नेता खासदार नाही
पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना पदावरून पायउतार करण्‍यासाठी गेल्‍या 8 तारखेपासून राजकीय कवायती करणा-यांपैकी एकही नेता संसदेचा प्रतिनिधी नाही ही अनोखी घटना आहे. तर स्‍वतः मनमोहन सिंग हे देखिल लोकांतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी नसून ते राज्‍यसभेचे खासदार आहेत.

कॉंग्रेस प्रणित संयुक्‍त पुरोगामी आघाडी सरकारचा पाठिंबा काढून सरकारला अल्‍पमतात आणण्‍याची करामत करून दाखविणा-या डाव्‍या पक्षाचे नेते प्रकाश कारत यांच्‍यासह, सरकार विरुध्‍द तिसरी आघाडी उघडणा-या उत्‍तर प्रदेशच्‍या मुख्‍यमंत्री मायावती, चंद्राबाबू नायडू, शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे यांच्‍यापैकी कुणीही प्रत्‍यक्ष लोकसभा किंवा राज्‍यसभेचा सदस्‍य नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi