Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'बरोबरी झाल्यास अध्यक्षांचे मत सरकारकडे'

माजी लोकसभाध्यक्ष संगमा यांचे मत

'बरोबरी झाल्यास अध्यक्षांचे मत सरकारकडे'

भाषा

, सोमवार, 21 जुलै 2008 (16:04 IST)
राजीनामा देऊन सरकारविरूद्ध मतदान करण्याच्या माकपच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यासाठी माजी लोकसभाध्यक्ष पी ए संगमा यांनी सोमनाथ चॅटर्जींचे अभिनंदन करून सभागृहात बरोबरी झाल्यास सभागृहाध्यक्ष सर्वसाधारणपणे सरकारच्या बाजूने मतदान करतात, असे स्पष्ट केले.

लोकसभाध्यक्षांनी पदाचा सन्मान राखणे आवश्यक आहे. सभागृहाध्यक्षाची कोणत्याही पक्षाशी बांधिलकी नसल्याचे राजीनामा न देण्याची त्यांची भूमिका योग्यच आहे. संगमा यांच्यासोबत त्यांची मुलगी अगाथा संगामाही उपस्थित होती.

विश्वासमत ठरावावर बरोबरी झाल्यास साधारणपणे सभागृहाध्यक्ष सरकारच्या समर्थनार्थ मतदान करतात. मात्र हे त्यांना बंधनकारक नाही. विश्वासमत ठरावावर आज चर्चेस सुरूवात झाली असून उद्या सायंकाळी मतदान होईल.

ठरावाचे समर्थक व विरोधक यांच्यातील संख्याबळ जवळपास समान असल्याचे चुरस रंगतदार ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi