Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजपचे आजारी खासदारही दिल्लीत दाखल

भाजपचे आजारी खासदारही दिल्लीत दाखल

भाषा

नवी दिल्ली , मंगळवार, 22 जुलै 2008 (12:23 IST)
विश्वासमत ठरावाच्या पार्श्वभूमीवर भाजपने पाच आजारी खासदारांना दिल्लीत आणण्यात यश मिळवले असून एका खासदारास मुंबईतील रूग्णालयातून विमानाने आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

महाराष्ट्रातील रमेश चव्हाण यांना काल रात्री दिल्लीत आणण्यात आले. बिकानेरचे खासदार धमेंद्रही पोहचले आहेत. पक्षाचे सर्व खासदार सरकारविरूद्ध मतदान करणार असून सपुआ सरकार कोसळण्याबाबत पक्षप्रवक्ते राजीव प्रताप रूडी यांनी विश्वास व्यक्त केला.

वरिष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयीही सत्रास उपस्थित राहून मतदान करतील. हाथरस येथील खासदार किशनलाल दिलेर संसदेस लागून असलेल्या राम मनोहर लोहिया रूग्णालयात वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.

मात्र वाजपेयी संसदेतील लॉबीत व्हिलचेअरवर बसून मतदान करतील. पाचवे खासदार महेश चंद्र कनोरीया अजूनही मुंबईतील रूग्णालयात आहेत. त्यांच्यासाठी एअर अॅम्बुलंस तैनात करण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi