Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'भारताने चीनसमोर जाणे डाव्यांना नापसंत'

'भारताने चीनसमोर जाणे डाव्यांना नापसंत'

एएनआय

नवी दिल्ली , मंगळवार, 22 जुलै 2008 (16:13 IST)
वित्तमंत्री पी चिदंबरम यांनी अणुसहकार्य कराराचे समर्थन करताना काही लोकांना भारताने चीनसमोर जाणे पसंत नसल्याची टिपणी करून डाव्यांवर फटकेबाजी केली.

डाव्या पक्षाच्या सदस्याने त्यांना चीन व भारतात तुलना का करत आहात, असा प्रश्न विचारल्यानंतर संतप्त झालेल्या चिदंबरम यांनी हे वक्तव्य केले. काहींना चीनने आर्थिक महासत्ता झाल्याचे बघायचे आहे.

आपणास चीनच्या प्रगतीचे वैषम्य नाही मात्र चीनपेक्षा मागे पडणेही पसंत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारताने आर्थिक सत्ता व आर्थिक महासत्ता बनावे, अशी‍ आपली इच्छा आहे.

भारताविषयी बोलताना भारताएवढाच विशाल व वैविध्य असलेल्या देशाविषयी बोलणे आवश्यक असून तो देश चीन आहे. भारतापेक्षा लहान किंवा गरीब देशांची आपण तुलना करणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi