Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विश्‍वासमत मिळविण्‍यासाठी सीबीआयचा वापर

बसपा खा.पाठक यांचा आरोप

विश्‍वासमत मिळविण्‍यासाठी सीबीआयचा वापर
विश्‍वासमत मिळविण्‍यासाठी कॉंग्रेसच्‍या लोकांनी आपणास धमकाविण्‍याचा प्रयत्‍न केला असून सरकारच्‍या बाजूने मतदान न केल्‍यास सीबीआयच्‍या माध्‍यमातून चौकशी लावून तुरुगांत डांबण्‍याची धमकी दिली आहे. आपल्‍या पक्षातील खासदारांना सरंक्षण देण्‍यात यावे, अशी मागणी बहुजन समाज पक्षाचे खा.ब्रजेश्‍ा पाठक यांनी केले आहे.

खा.पाठक यांनी सरकारवर गंभीर स्‍वरूपाचे आरोप करीत सरकारने लोकशाहीचा गळा घेटला असल्‍याचा आरोप केला. सरकार लोकशाहीचे धिंडवडे काढून जर बहुमत मिळविणार असल्‍यास ही लाकशाहीची मोठी शोकांतिका ठरेल असे सांगत त्‍यांनी या संदर्भात सभापती चॅटर्जी यांच्‍याकडे आरोपांचे व संरक्षण मिळविण्‍याची मागणी करणारे पत्र सादर केले.

यासंदर्भात सभापतींनी कागदपत्रे स्‍वीकारून गृहमंत्रालयाला यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले.

Share this Story:

Follow Webdunia marathi