संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या विश्वास मत ठरावाबाबत संसदेत गंभीर चर्चा रंगली असताना स्वतःची 'डील'पूर्ण करून फायदा करून बसलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाच्या शिबू सोरेनला या सगळया उठाठेवींशी काहीही देणेघेणे नाही. सोमवारी पंतप्रधानांच्या विश्वासमत ठरावावर चर्चे दरम्यान शिबू सोरेन सभागृहात चक्क झोपले असल्याचे दिसून आले. आपल्या लोकप्रतिनिधींना देशाची किती काळजी आहे हेच यावरून स्पष्ट होते.
संसदेत विरोधी पक्ष नेते लालकृष्ण अडवाणी यांचे भाषण सुरू असताना सोरेन चक्क झोपलेल्या अवस्थेत आढळून आले.