Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केंद्र सरकार आयसीयूमध्ये-अडवानी

केंद्र सरकार आयसीयूमध्ये-अडवानी

भाषा

नवी दिल्ली , सोमवार, 21 जुलै 2008 (15:27 IST)
विरोध पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी अणू करार व महागाईवरून सरकारवर हल्ला चढवताना सद्य परिस्थितीसाठी सरकार स्वतःच जबाबदार असल्याचे स्पष्ट केले.

विश्वासदर्शक ठरावावर बोलावण्यात आलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात बोलताना सरकारची स्थिती अतिदक्षता विभागातल्या रूग्णासारखी असल्याचे सांगितले. अणु करार दोन देशातील नसून दोन व्यक्तीतील असल्याचे चित्र निर्माण झाले आहे, असे सांगून आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेस सादर करण्यात येणाऱ्या मसुद्यावर सरकारच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली. मसुदा देशातील जनतेसाठी खुला का करण्यात येत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मनमोहन सरकारने आघाडी धर्माचे पालन न केल्यामुळेच विश्वासदर्शक ठरावाची वेळ आली आहे. आम्हांस संसदेत सरकारचा पराभव करायचा असून सरकार अस्थिर करायचे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अणू सहकार्य करारावरून मतभेदानंतर डाव्यांनी पाठिंबा काढल्याने मनमोहन सरकार अल्पमतात आले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi