Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'बसपचे खासदार करणार सरकारचे समर्थन'

सपाचे अध्यक्ष मुलायम सिंग यांचा दावा

'बसपचे खासदार करणार सरकारचे समर्थन'
पक्षाच्या छावणीत बंडखोरीमुळे चिंतेचे वातावरण परसले असताना समाजवादी पक्षाने बसपाचे खासदार लोकसभेत सपुआ सरकारचे समर्थन करणार असल्याचा दावा करून खळवबळ उडवून दिली आहे.

पक्षाध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी काही खासदारांनी पक्षास अडचणीत आणल्याचे मान्य केले, मात्र इतर पक्षातून यापेक्षा अधिक खासदार वळवल्याचा दावा केला. कॅमेराचा झोत चुकवत ते मागच्या दाराने प्रवेश करत आहेत.

पक्षाचे सरचिटणीस अमर सिंग यांनी बसपाचे सात ते आठ खासदार आपल्या घरात असल्याचा गौप्यस्फोट यावेळी केला. मुलायम यांनी सपुआ सरकारला बहुमतासाठी फक्त 271 खासदारांची आवश्यकता असताना 287 खासदार सपुआचे समर्थनास सज्ज झाल्याचे सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi