Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजपाच्‍या बाजूने सर्वाधिक क्रॉस वोटिंग

रालोआचे 10 खासदार फुटले

भाजपाच्‍या बाजूने सर्वाधिक क्रॉस वोटिंग
ND
विरोधी पक्षांच्‍या बाजूने मते फुटल्‍यानेच संपुआला विश्‍वासमत ठराव मोठया फरकाने जिंकता आला आहे. भाजप प्रणित राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीला मोठया प्रमाणावर खासदारांची अनुपस्थिति आणि मते फुटली. त्‍यामुळे सरकारच्‍या विश्वासमत ठराव जिलंकण्‍याचा मार्ग मोकळा झाला. दोन्‍ही बाजूने अटीतटीची मते पडतील याबददलच्‍या सर्व अपेक्षा तशाच राहिल्‍या आहेत.

प्रमुख विरोधी पक्ष असलेल्‍या भाजपाची स्थिति यात सर्वात खराब राहिली. पक्षाचे सहा खासदार फुटले आणि त्‍यांनी मनमोहन सरकारच्‍या बाजूने मतदान केले. विरोधी पक्ष नेते लालकृष्‍ण अडवाणी यांनीही आपले 10 खासदार फुटल्‍याचे मान्‍य केले आहे.

त्‍यांनी सांगितले, की संपुआची वास्तविक संख्या 265 होती. मात्र ते आमचे 10 खासदार फोडण्‍यात यशस्‍वी ठरले. भाजपा नेता शाहनवाज हुसैन यांनी सांगितले, की कर्नाटकच्‍या खासदारांमुळे पक्षाला मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.

बिजू जनता दल, जनता दल यूनायटेड, शिवसेना आणि अकाली दल सारख्‍या रालोआतील इतर घटक पक्षाच्‍या खासदारांनीही पक्षादेशाचे उल्‍लंघन करून मतदान केले आहे.

भाजपतून निलंबित करण्‍यात आलेले गुजरातमधील दोघे खासदार सोमाभाई पटेल व बाबूभाई कटारा, बृजभूषण शरणसिंह (उत्तरप्रदेश), चंद्रभानसिंह (मध्यप्रदेश), हरिभाऊ राठोड (महाराष्ट्र), मंजुनाथ (कर्नाटक) आणि सांगलियाना (बंगळूर) यांनी प्रस्तावाच्‍या बाजूने मतदान केले आहे. ही गोष्‍ट भाजप नेत्‍यांनीही मान्‍य केली आहे. उडुपीच्‍या महिला खासदार मनोरमा माधवराज चर्चेच्‍या वेळी सभागृहात असूनही मतदानास त्‍या अनुपस्थित राहिल्‍या.

जदयूचे दोन खासदार पीपी कोया (लक्षद्वीप) आणि रामस्वरूप प्रसाद (नालंदा) यांच्‍यासह बीजू जनता दलाच्‍या दोन खासदारांनीही क्रॉस वोटींग केले आहे. तर अकाली दलाचा एक खासदार फुटल्‍याची शंका आहे. शिवसेनेचे खा.तुकाराम रेंगे मतदानास अनुपस्थित होते.

संपुआ सरकारच्‍या बाजूने मतदान करणारे खासदार हरिहर स्वेन यांच्‍यावर त्‍वरित कारवाई करीत बिजू जनता दलाने त्‍यांना निलंबित करण्‍याची घोषणा केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi