Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सपुआस 276 खासदारांचे समर्थन: मुखर्जी

सपुआस 276 खासदारांचे समर्थन: मुखर्जी

भाषा

नवी दिल्ली , सोमवार, 21 जुलै 2008 (17:03 IST)
परराष्ट्रमंत्री व कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला 276 खासदारांचे समर्थन असल्याचे स्पष्ट करून सरकार बहुमत सिद्ध करेल, असे ठासून सांगितले.

विरोधक व डाव्यांना त्यांना वास्तव व पुराव्यांवर आधारीत भूमिका मांडण्याचा सल्ला देऊन तथ्यांची धरपकड करू नये, असा सल्ला दिला. याबाबत त्यांनी अडवाणींवर आक्षेप घेतला.

डाव्यांवर सरकार अस्थिर करण्याचा आरोप करून डाव्यांनी पाठिंबा काढल्यानंतर समाजवादी पक्षाच्या 39 खासदरांच्या पाठिंब्याने सपुआचे संख्याबळ 276 वर पोहचल्याचे त्यांनी सांगितले. याचसोबत सपुआ राष्ट्रीय हिताशी तडजोड करणार नाही, असेही स्पष्ट केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi