Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सरकारला 291 खासदारांचे समर्थन: राजद

सरकारला 291 खासदारांचे समर्थन: राजद

भाषा

नवी दिल्ली , सोमवार, 21 जुलै 2008 (15:25 IST)
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमधील प्रमुख सहयोगी पक्ष राष्ट्रीय जनता दलाने सरकारला 291 हून अधिक खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करून लोकसभेत सरकार विश्वामत जिंकेल असे स्पष्ट केले आहे.

समर्थकांचे संख्याबळ सतत वाढत असून 291 चा आकडा पार झाला आहे. सरकार मोठ्या फरकाने विश्वसमत जिंकेल, असे रेल्वेमंत्री व राजदचे सर्वेसर्वा लालुप्रसाद यादव यांनी स्पष्ट केले.

अणुसहकार्य कराराचे जोरदार समर्थन करताना त्यांच्या खास शैलीत लोक चंद्रावर जमीन नोंदणी करण्याच्या युगात भारताने ऊर्जेच्या पूर्तीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब हिताचाच ठरेल. सरकारने विश्वासमत संपादन केल्यास देशवासीयांकडून सरकारच्या निर्णयावर शिक्कीमोर्तबच होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi