Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात 1,823 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

राज्यात 1,823 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी
, सोमवार, 11 ऑक्टोबर 2021 (08:43 IST)
राज्यातील कोरोना संसर्गाची  दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तवली जात आहे. राज्यात अजुनही दररोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत असून, कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. राज्यात रविवारी  बरे झालेल्या रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या 24 तासात 1 हजार 823 रुग्ण बरे झाले आहेत. तर 2 हजार 294 नवीन कोरोनाबाधित आढळले आहे.
 
राज्यात गेल्या 24 तासात 28 कोरोनाबाधित रुग्णांचा  मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 39 हजार 542 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत 64 लाख 01 हजार 287 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.32 टक्के एवढे झाले आहे.

सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 65 लाख 77 हजार 872 इतकी आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 01 लाख 98 हजार 173 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 77 हजार 872 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात 2 लाख 41 हजार 892 व्यक्ती गृह विलगिकरणात आहेत.तर, 1 हजार 093 व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात (institutional quarantine) आहेत. राज्यात एकूण 33 हजार 449 अॅक्टिव्ह रूग्ण (Active Cases) आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वसुंधरा प्रकल्पाला नागरिकांचा विरोध, टेकडी वाचविण्यासाठी मनसे देखील रस्त्यावर