Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 5 April 2025
webdunia

राज्यात १ लाख १६ हजार ५४३ अॅक्टिव्ह रुग्ण

1 lakh 16 thousand 543
, बुधवार, 4 नोव्हेंबर 2020 (08:22 IST)
राज्यात मंगळवारी ४ हजार ९०९ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ६ हजार ९७३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात १५ लाख ३१ हजार २७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९०.४६ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये १२० करोना मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर हा २.६१ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. 
 
आतापर्यत तपासण्यात आलेल्या ९१ लाख २० हजार ५१५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ९२ हजार ६९३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १७ लाख ९५ हजार, ६६६ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ११ हजार ९६९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. सध्या  राज्यात १ लाख १६ हजार ५४३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १६ लाख ९२ हजार ६९३ इतकी झाली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केंद्र सरकार हस्तक्षेप, हे निंदनीय आहे : सुप्रिया सुळे