Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात १० हजार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी

राज्यात १० हजार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी
मुंबई , बुधवार, 12 ऑगस्ट 2020 (08:02 IST)
राज्यात मंगळवारी १० हजार १४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ६८ हजार ४३५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ६८.७९ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ११ हजार ८८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे, राज्यात सध्या १ लाख ४८ हजार ५५३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

राज्यात आज २५६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४२ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २८,३७,५७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५,३५,६०१ (१८.८७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात १०,०४,२३३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३५,६४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहिहंडी उत्सवानिमित्त शुभेच्छा