Publish Date: Thu, 01 Jul 2021 (07:40 IST)
Updated Date: Thu, 01 Jul 2021 (07:41 IST)
महाराष्ट्रात बुधवारी 10 हजार 353 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 58 लाख 19 हजार 901 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 96.02 एवढा झाला आहे.
आरोग्य विभागाने याबाबत प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात बुधवारी 9 हजार 771 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 60 लाख 61 हजार 404 एवढी झाली आहे. सध्याच्या घडीला राज्यात 1 लाख 16 हजार 364 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात बुधवारी 141 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 21 हजार 945 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.01 टक्के एवढा झाला आहे. राज्यात आतापर्यंत 4 कोटी 16 लाख 37 हजार 950 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 6 लाख 17 हजार 926 लोक होम क्वारंटाईन आहेत तर, 4 हजार 173 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.